बदलापूर पालिका : मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपद सेनेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:25 IST2019-06-05T00:25:26+5:302019-06-05T00:25:39+5:30
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी राज्याप्रमाणे बदलापुरातही शिवसेना भाजपची युती झाली होती. याद्वारे भाजपला उपनगराध्यक्षपद तसेच एक विषय समिती सभापतीपद व एक उपसभापती पद देण्यात आले होते

बदलापूर पालिका : मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपद सेनेकडे
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेत वर्षभरापासून भाजपकडे असलेले मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपद आता शिवसेनेकडे आले आहे. सोनिया ढमढेरे यांची मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मंगळवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. या सभेत सुरूवातीला भाजपचे किरण बावस्कर, शरद तेली तसेच शिवसेनेच्या सोनिया ढमढेरे, मुक्ता पांडे,प्रतिभा गोरे यांची मागासवर्गीय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. या सदस्यांमधून ढमढेरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी राज्याप्रमाणे बदलापुरातही शिवसेना भाजपची युती झाली होती. याद्वारे भाजपला उपनगराध्यक्षपद तसेच एक विषय समिती सभापतीपद व एक उपसभापती पद देण्यात आले होते. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र उपनगराध्यक्षपदावरून बिनसल्याने सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या विषय समिती निवडणुकीच्यावेळी मात्र भाजप शिवसेनेची पुन्हा हातमिळवणी झाली.
भाजपला पुन्हा एकदा पाणीपुरवठा समिती सभापतीपद व महिला बालकल्याण उपसभापतीपद मिळाले. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी भाजपचे हेमंत चतुरे यांची मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे आता हे पद भाजपकडे राहील, असा अंदाज वर्तवला जात होता.