शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:08 AM

ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.उन्हाळा सुरू झाला की, जिल्ह्यासह ठाणे शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो. परंतु, लोकसंख्येचा विचार करून ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त पाणीपुरवठा होतो. असे असतानाही शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी झगडावे लागते. मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतिदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नासाडी बदलापूरला रोज लागणाºया ४० एमएलडीपेक्षाही नऊ एमएलडीने जास्त आहे.शहराची आजची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात असून तिला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणीटंचाईची तक्रार करीत महिलांचा मोर्चा आला होता. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागांतही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अशी होत आहे नासाडी : ठाणे महापालिकेला एमआयडीसी, स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात पाणीपुरवठा करणाºया अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठी पाणीगळती होत आहे. काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातून बिलांचे वाटप होत आहे, तर काही ठिकाणी ती ठोक दिली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराचा योग्य अंदाज बांधणे शक्य नसल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे.गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठासेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून तिची पाण्याची गरज ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असूनही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यावर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणीपुरवठा होत होता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे