बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: January 26, 2017 03:04 IST2017-01-26T03:03:24+5:302017-01-26T03:04:21+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारी हाजीमलंग रोडवरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली.

बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारी हाजीमलंग रोडवरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली. त्यात बेकायदा उभारलेली वाहतूक चौकी जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेचे ‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले व ‘ड’ प्रभागक्षेत्र अधिकारी शांतिलाल राठोड यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या वेळी म्हसोबा चौक ते कोळसेवाडी रोडवरील दोन्ही बाजूंस पदपथावरील बेकायदा उभारलेल्या १२५ शेड आणि टपऱ्या तोडण्यात आल्या.
विठ्ठलवाडी स्मशानभूमीसमोरील शासकीय जमिनीवरील ५ बेकायदा शेडही तोडण्यात आल्या. या कारवाईसाठी महापालिकेचे ५० कर्मचारी, २५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागांतर्गत येणाऱ्या देवीचापाडा येथील बेकायदा ३ दुकान गाळे, प्रभाग अधिकारी शरद पाटील, सहायक आयुक्त श्रीकृष्ण लेंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तोडण्यात आले. (प्रतिनिधी)