शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यात बालिकेचा करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:25 IST

भरधाव वाहनाच्या धडकेत ठाण्यातील बाळकूम भागातील बालिकेचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देचालक फरारगुन्हा दाखलसीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासणार

ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेने एका पाच वर्षीय बालिकेचा मंगळवारी बाळकुम येथे करूण अंत झाला. परिसरातील सीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासून वाहनाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.बाळकुम येथील सर्व्हिस रोडला लागून असलेल्या शिवाजी नगरातील रहिवासी सुनील काशिनाथ राठोड यांची पाच वर्षांची मुलगी चेतना घराजवळील एका किराणा दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला शौचाला बसली होती. त्यावेळी एका भरधाव वाहनाने बालिकेला चिरडले. वाहन अंगावरून गेल्याने बालिकेचा कमरेपासून पोटापर्यंतचा भाग फाटला. या अपघातामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन बालिकेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर वाहन चालक लगेच पसार झाला.अपघाताच्या वेळी जवळपास कुणीच नव्हते. त्यामुळे वाहन नेमके कोणते होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र परिसरातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार इनोव्हा कारने बालिकेचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. परिसरातील आस्थापनांच्या सीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासून वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए.टी. वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या भागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी वाहनांची चाचणी घेण्याचे काम करतात. या अपघातामागे हेदेखील एक कारण असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. बालिकेच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. तिचे वडिल चालक असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात