ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 07:34 PM2017-12-07T19:34:54+5:302017-12-07T19:37:22+5:30

ठाण्यात बुधवारी अपघाताच्या चार तक्रारी दाखल झाल्या. या अपघातांमध्ये दोन विद्यार्थी, दोन रिक्षा चालक आणि एक महिला जखमी झाली.

Five students including five injured in separate accidents in Thane | ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी

ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी

Next
ठळक मुद्देअपघाताच्या चार घटनादोन रिक्षा चालकही जखमीमहिलेस कारची धडक

ठाणे : ठाण्यात बुधवारी दाखल झालेल्या अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पातलीपाडा येथे एका कारने दोन पादचारी विद्यार्थ्यांना धडक दिली. हिरानंदानी येथे आझादनगरातील दोन विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा अपघात घडला. सुमीत हरिश यादव आणि प्रथमेश विलास शिंदे हे या अपघातात जखमी झाले. सुमीत यादवे याने बुधवारी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी कार चालक महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
दुसºया एका घटनेत मुंबई-नाशिक महामार्गावरील ह्युंडाई शोरूमसमोर रस्ता ओलांडणाºया एका महिला पादचार्‍यास भरधाव कारने धडक दिली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातामध्ये वागळे इस्टेटमधील हाजुरी दर्गा येथील रहिवासी खालिदा मोहम्मद हुसेन शेख (वय ५८) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला.
घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड सिग्नलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक रिक्षा चालक बुधवारी पहाटे जखमी झाला. आझादनगरातील मद्रासी चाळीत राहणारे किशोर सावंत हे ब्रम्हांड सिग्नलजवळ रिक्षा मागे वळवत असताना हा अपघात झाला. या अपघातात सावंत यांचा पाय मोडला असून, रिक्षाचेही नुकसान झाले. सावंत यांच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
कापूरबावडी येथील आशापुरा माता मंदिरासमोर एका भरधाव वाहनाने आॅटोरिक्षाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आत्माप्रसाद गुप्ता हे रिक्षाने मंदिरासमोरून जात असताना समोरच्या बसने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे गुप्ता यांनीही जोरात ब्रेक मारून रिक्षा थांबवली. त्यामुळे मागून येणार्‍या वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. गुप्ता यांच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला.

Web Title: Five students including five injured in separate accidents in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.