बालविवाहातून सुटका झालेल्या मुलीची सुधारगृहात छळ, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप
By सदानंद नाईक | Updated: March 5, 2025 17:43 IST2025-03-05T17:43:22+5:302025-03-05T17:43:59+5:30
Ulhasnagar News: बालविवाह रोखून बाल विकास समितीने मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचा छळ झाल्याने, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बालविवाहातून सुटका झालेल्या मुलीची सुधारगृहात छळ, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप
- सदानंद नाईक
उल्हासनगर - बालविवाह रोखून बाल विकास समितीने मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचा छळ झाल्याने, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुलीच्या सुटकेसाठी बाल कल्याण समितीच्या एका महिला सदस्यांने दी ड लाख रुपये मागितल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांनी करून खळबळ उडून दिली.
उल्हासनगर पूर्वेतील एका हॉल मध्ये २४ फेब्रुवारी रोजी होत असलेला बालविवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व पोलिसांना यश आले. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी नवरा मुलगा, त्याचे आई-वडील, मुलीचे आई-वडील व मध्यस्थी अश्या १० जणावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीवर समुउपदेश होण्यासाठी व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ पर्यंत महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा राणी भैसाणे यांनी मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी स्टॅम्प पेपरवर मुलीच्या सुरक्षेची हमी (माफीनामा ) देऊन मुलगी ताब्यात देण्याची मागणी केली. निरीक्षणगृहात रवानगी झालेल्या मुलीचे समुपदेशन होण्याऐवजी निरीक्षणगृहातील इतर मुलीकडून तीचा छळ केल्याचे उघड झाले.
निरीक्षणगृहातील मुलीनी तीला भांडे व कपडे धुणे, पाणी भरण्यास सांगणे, साफसफाई करणे आदी कामे करण्यास भाग पाडले. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुलीची तब्येत बिघडल्याचा फोन निरीक्षणगृहातून आई-वडिलांना आल्यावर त्यांनी धाव घेऊन मुलीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मुलीने निरीक्षणगृहात छळ झाल्याचे सांगितले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी बाल समिती केंद्राच्या झेंडे नावाच्या सदस्यांने मुलीच्या सुटकेसाठी दिड लाख रुपये मागितल्याचा आरोप केला. आम्ही माफीनामा लिहून दिल्यावरही मुलीची सुटका करून आम्हाच्या ताब्यात का दिले नाही. असा प्रश्न केला.
मुलीला झाली मारहाण
शासकीय मुलीचे निरीक्षणगृहात १५ पेक्षा जास्त मुली असून त्यांच्याt भांडणे होतात. या मुलीलाही मारहाण व छळ झाला असावा, असे हाणामारीचे प्रकार सुधारगृहात होतात.
- व्ही व्ही सिल्व्हर-अधिक्षिका- मुलीचे निरीक्षणगृह
बाल समितीवर राजकीय दबाव
बालविवाह रोखलेल्या मुलीचे समुउपदेश व्हावे, ती सुरक्षित राहावी म्हणून तीला निरीक्षणगृहात ठेवले. तिच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होती. मात्र मुलीच्या आई-वडिलांनी बाल समितीवर राजकीय दबाव आणून आम्हची सुरक्षा धोक्यात आली. दिड लाख रुपये मागितल्याचा आरोप खोटा असून त्याबाबत त्यांनी पुरावा सादर करावा.
- अध्यक्षा ठाणे महिला व बाल समिती