बी. आर. घाडगे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST2021-05-14T04:40:12+5:302021-05-14T04:40:12+5:30

कल्याण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार करणारे पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या ...

B. R. Police protection to Ghadge's family | बी. आर. घाडगे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण

बी. आर. घाडगे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण

कल्याण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार करणारे पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार केली होती. तिची दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

घाडगे हे सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परमबीर सिंह यांच्यासह अन्यजणांच्या विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार करणार आहेत. घाडगे हे अकोला येथे कार्यरत असले तरी त्यांचे कुटुंब हे कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहते. त्यांच्या कुटुंंबीयांच्या संरक्षणार्थ चार पोलीस तैनात केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त पोवार यांनी दिली.

Web Title: B. R. Police protection to Ghadge's family