आयलानी, कलानींचे राजकीय अस्तित्व पणाला

By Admin | Updated: February 6, 2017 04:21 IST2017-02-06T04:21:58+5:302017-02-06T04:21:58+5:30

भाजपाने निष्ठावंतांना डावलून ओमी कलानी टीमला मागच्या दारातून प्रवेश दिला. या प्रवेशाने भाजपाचा चेहरा काळवंडला असून कुमार आयलानी यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे

Ayalani, Kalani's political existence | आयलानी, कलानींचे राजकीय अस्तित्व पणाला

आयलानी, कलानींचे राजकीय अस्तित्व पणाला

सदानंद नाईक, उल्हासनगर
भाजपाने निष्ठावंतांना डावलून ओमी कलानी टीमला मागच्या दारातून प्रवेश दिला. या प्रवेशाने भाजपाचा चेहरा काळवंडला असून कुमार आयलानी यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. दोघांनी महापौरपदावर हक्क सांगितल्याने त्यांचे समर्थक आपसात भिडल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनाविना सत्ता आणण्यासाठी भाजपाने ओमी कलानी टीमला विनाअट प्रवेश दिला. सिंधी परिसरात भाजपाने या टीमच्या मदतीने वर्चस्व निर्माण केले आहे. दरम्यान, महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने आयलानी व कलानी यांना त्याचे डोहाळे लागले. त्यासाठी त्यांनी एकमेकांच्या कट्टर समर्थकांना निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. ओमी कलानी यांना तीन अपत्ये असल्याची माहिती भाजपातील एक गटाने विरोधी उमेदवार रिपाइंचे भगवान भालेराव यांना दिल्याचा आरोप होत आहे.
भाजपात महापौरपदाचे उमेदवार म्हणून ओमी कलानी व कुमार आयलानी यांनी आपल्या धर्मपत्नींचे नाव पुढे केले. यातून दोघांत संघर्ष निर्माण झाला असून भाजपाने उमेदवारांची नाराजी उभी केली. पक्षातील अनेक जुने नेते व निष्ठावंतांना डावलल्याचा परिणामही पक्षाच्या मतांवर होणार आहे. आयलानी यांनी पक्षाचे मास्टर माइंड राजा गेमनानी यांना हाताशी धरून शहरात पूर्वेतील शिवसेना बालेकिल्ल्यात तगडे उमेदवार दिले. प्रभाग क्र.-२०, १९, १५ व १६ मध्ये शिवसेना उमेदवाराच्या तोडीसतोड उमेदवार दिल्याने शिवसेना गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Ayalani, Kalani's political existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.