‘काहीतरी कर ठाणेकर’अंतर्गत जागृती

By Admin | Updated: October 1, 2015 23:41 IST2015-10-01T23:41:13+5:302015-10-01T23:41:13+5:30

लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमास ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आता पुढील टप्प्यात ध्वनिप्रदूषण आणि साखळीचोरीविरुद्ध एक जनजागृती अभियान लोकमत घेऊन येत आहे

Awareness under 'Som Kar Kar Thanekar' | ‘काहीतरी कर ठाणेकर’अंतर्गत जागृती

‘काहीतरी कर ठाणेकर’अंतर्गत जागृती

ठाणे : लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमास ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आता पुढील टप्प्यात ध्वनिप्रदूषण आणि साखळीचोरीविरुद्ध एक जनजागृती अभियान लोकमत घेऊन येत आहे. ३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता तीनहात नाका, ठाणे (प.) येथे ‘उगाचच हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करू नका’, असे आवाहन ठाणेकरांना करण्यात येणार आहे.
मंगळसूत्रचोरी किंवा साखळीचोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे महिलांच्या मनात दहशत निर्माण झाली असून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच, ३ आॅक्टोबरलाच संध्याकाळी ५.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, पाचपाखाडी येथे एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादात पोलीस अधिकारी सहभागी होणार आहेत. तरी, अधिकाधिक वाचकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात येत आहे.
----
अधिक माहितीसाठी संपर्क-
८६५२२००२२६/९८७०९१२२३३
----
स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्य’ मालिकेतील पीएसआय भूमिकेतील वीरेंद्र कदम अर्थात जगन्नाथ निवंगुणे आणि प्रेरणा सरदेसाई अर्थात धनश्री क्षीरसागर, हेडकॉन्स्टेबल भूमिकेतील मारुती जगदाळे अर्थात कमलेश सावंत.

Web Title: Awareness under 'Som Kar Kar Thanekar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.