ग्रामीण भागात ‘लालपरी’ची काेराेनाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:14+5:302021-03-23T04:43:14+5:30

शेणवा : काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अविरत सेवा देणारी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने सुरक्षेच्या ...

Awareness of ‘Lalpari’ about Kareena in rural areas | ग्रामीण भागात ‘लालपरी’ची काेराेनाविषयी जनजागृती

ग्रामीण भागात ‘लालपरी’ची काेराेनाविषयी जनजागृती

Next

शेणवा : काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अविरत सेवा देणारी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने सुरक्षेच्या दृष्टीने काेराेनाला राेखण्यासाठी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हे ब्रिद वाक्य वापरून प्रवाशांमध्ये काेराेनाच्या नियमांची जनजागृती माेहीम सुरू केली आहे.

शहापूर एसटी आगारात सध्या ५५ बस असून सहा बस लांबपल्ल्यावर धावतात. तर इतर बस तालुक्यातील किन्हवली, मुरबाड, डोलखांब, चोंढा, शिदपाडा, कोठारे, साकडंबाव, वाशाला, कसारा, माहुली, खरांगण, आपटे अस्नोली, टाकीपठार या मार्गावर धावतात. शहरी आणि ग्रामीण भागात धावणाऱ्या या बसवरील जाहिराती प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातून मास्क नाही तर बसमध्ये प्रवेश नाही असे सांगतानाच प्रवाशांना काेराेनापासून बचावासाठी करण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बसमधील प्रवाशांच्या ताेंडाला मास्क नसेल तर वाहक त्यांना त्वरित तशा सूचना करत आहेत. एसटीच्या लालपरीने काेराेना आणि लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण प्रवाशांना माेठा दिलासा दिला हाेत. या काळातील लालपरीची सेवा काैतुकास्पदच आहे, असे शहापूरच्या किशाेर वरकुटे या प्रवाशाने म्हटले आहे.

Web Title: Awareness of ‘Lalpari’ about Kareena in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.