शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश जाधव यांच्या मध्यस्थीने मनसेचे आमरण उपोषण आंदोलन स्थगित

By नितीन पंडित | Updated: November 2, 2022 20:15 IST

आंदोलनाकर्त्यांच्या काही मागण्या मान्य, १५ दिवसांत आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी महानगर पालिकेमधील शेकडो कामगारांवर प्रशासना कडून अन्याय होत असून नियम व शर्तीचा भंग करून पालिकेचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे भिवंडी युनिट अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालय समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.बुधवारी मनसे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यस्तीने साळवी यांच्या काही मागण्या मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी मान्य केल्या नंतर बुधवारी सायंकाळी उपायुक्त दीपक झिंजाड यांच्या हस्ते लिंबू शरबत पिऊन संतोष साळवी यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

मनसेने पुकारलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी दुसरा दिवस होता.सायंकाळी अविनाश जाधव यांनी मनपा आयुक्त म्हसाळ यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी सेवा जैष्ठते प्रमाणे प्रभारी अधिकारी पदांची नियुक्त केली जाणार असून शासन निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात येईल,सातवा वेतन आयोगाचा सन जानेवारी २०१६ पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना आठ दिवसात अभ्यास करून लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल,बकरी ईदच्या कामातून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून बकरी ईद चे काम कंत्रातदारांकडून करून घेण्यात येणार, निवृत्त कर्मचाऱ्यांचा १२:२४ चा फरक पुढील १५ दिवसात मार्गी लावणार या व अशा विविध मागण्या मनपा आयुक्त म्हसाळ यांनी आंदोलनाकर्त्यांच्या मान्य केल्या आहेत.या चर्चेदरम्यान आयुक्तांनी दिलेले आश्वासन पंधरा दिवसात मार्गी न लागल्या तर मी स्वतः मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशारा यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनपा प्रशासनाला देत साळवी यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले.

आमचे नेते अविनाश जाधव यांनी आयुक्तांशी चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या आहेत तर काही मागण्या येत्या काळात मनपा प्रशासन सोडविणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले असल्याने आपले आमरण उपोषण आज स्थगित केले आहे अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे भिवंडी शराध्यक्ष संतोष साळवी यांनी दिली आहे.

टॅग्स :MNSमनसेbhiwandiभिवंडीagitationआंदोलनStrikeसंप