नवे शैक्षणिक धोरण स्वायत्त महाविद्यालयांनी अमलात आणावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:47+5:302021-07-09T04:25:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सात दिवसीय कार्यशाळेतील सर्व कल्पक गोष्टींचा वापर करून नवे शैक्षणिक धोरण स्वायत्त महाविद्यालयांनी अमलात ...

नवे शैक्षणिक धोरण स्वायत्त महाविद्यालयांनी अमलात आणावे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सात दिवसीय कार्यशाळेतील सर्व कल्पक गोष्टींचा वापर करून नवे शैक्षणिक धोरण स्वायत्त महाविद्यालयांनी अमलात आणावे व होणाऱ्या नवीन बदलांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे (रुसा) मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी केले.
या प्रसंगी जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी आपल्या मनोगतात भगवद्गीतेतील श्लोकाचा उल्लेख करत ज्ञानाचे महत्त्व विशद केले. आपण समाजाचे देणे लागतो हा भाव शिक्षण क्षेत्रात रुजावा, असेही त्या म्हणाल्या.
सात दिवसीय कार्यशाळेत अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. यामध्ये सायंटिफिक रिसर्च सेंटर वझे-केळकर महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. बर्वे, सोमय्या विद्यापीठाचे गौरांग शेट्टी, डॉ. राधा अय्यर, सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. फ्रेझर मॅकहरेन्स, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विवियन अमोणकर, नाशिकच्या के. टी. एच. एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. माधुरी पेजावर, ‘टिस’च्या मैथिली रामचंद्र, मुंबई विद्यापीठाच्या डॉ. सीबील थॉमस, शिक्षण सहसंचालक डॉ. जगताप इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या संयोजनात अंतर्गत गुणवत्ता संवर्धन कक्षाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा राजेबहादूर व रामानंद आर्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पद्माकर माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यशाळेसाठी दोनशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी काही प्राध्यापकांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेतील आपले अनुभव व्यक्त केले.
-----------------