उल्हासनगर वालधुनी नदीवरील पुलाला मुहूर्त?; जलवाहिनीचा अडथळा होणार दूर
By सदानंद नाईक | Updated: October 9, 2023 17:11 IST2023-10-09T17:10:57+5:302023-10-09T17:11:15+5:30
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो.

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पुलाला मुहूर्त?; जलवाहिनीचा अडथळा होणार दूर
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वालधुनी पुलाला अडथळा ठरलेली जलवाहिनीच्या कामाला आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याने, पुलाचे काम लवकर सुरू होण्याची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो. मात्र नदीवरील पूल धोकादायक झाल्याने, महापालिकेने दिड वर्षांपूर्वी पूल पाडून टाकला. पुलाचे काम नव्याने सुरू करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. मात्र पुला जवळून जाणारी जलवाहिनी पुलाला अडथळा ठरली. जलवाहिनी हटविल्या शिवाय नदीवरील पुलाचे काम सुरू करता येत नाही. असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला. अखेर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जलवाहिणीचा अडथळा दूर करण्यासाठी आयुक अजीज शेख यांनी पुढाकार घेतला. दरम्यान माजी नगरसेविका सविता रंगडे-तोरणे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सोमवारी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन, त्यांनीं नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी येत्या दोन दिवसात जलवाहिनी हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नदीवरील पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत दिले. पुला अभावी चाकरमानी व नागरिकांना लांब अंतरावरील रस्त्याचा उपयोग करावा लागत असल्याने, त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखविली आहे. जलवाहिनी पुला शेजारी नसतीतर, पुलाचे कामकाज आज पूर्ण होणार असल्याचे ठेकेदारांची म्हणणे आहे.