ठाणे जिल्ह्यातील साडेबारा हजार राजपत्रित अधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभेला उपस्थिती
By सुरेश लोखंडे | Updated: August 16, 2019 19:58 IST2019-08-16T19:50:42+5:302019-08-16T19:58:37+5:30
गोरेगाव (पूर्व) येथे १७ ते १८ आॅगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. या सभेसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडे बारा हजार राजपत्रित अधिकारी उपस्थित राहणार

राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची व्दी वार्षिक सर्वसाधारण सभा आरे कॉलनीतील हॉटेलमध्ये गोरेगाव (पूर्व) येथे
ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची व्दी वार्षिक सर्वसाधारण सभा आरे कॉलनीतील हॉटेलमध्ये गोरेगाव (पूर्व) येथे १७ ते १८ आॅगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. या सभेसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडे बारा हजार राजपत्रित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे या राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचा हवाला देत ठाणे जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. अविनाश भागवत यांनी लोकमतला सांगितले.
या व्दिवार्षिक सभेच्या पहिल्या दिवशी या महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. यानंतर कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे संघटन बांधणी व कल्याण केंद्र उभारणी या विषयावर मार्गदर्शन होईल. राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुत स्वाधीन क्षेत्रीय यांचे ‘लोकसेवा हक्कांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन होईल. व्दि वार्षिक अहवालावरील चर्चेनंतर ‘वस्तू व सेवा कर कायदा’ यावर डॉ. मधूकर गिरी यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय ‘अपहार प्रकरणे कशी हाताळावीत’ या विषयावर रविंद्र धोंगडे यांचे उपस्थित अधिकाºयांना मार्गदर्शन होणार आहे.
या सभेच्या दुस-या दिवशी महिलांचे प्रश्न व त्यावरील उपाय, चर्चाविनिमय व निर्णय या विषयावर डा. सोनाली कदम आपले मत व्यक्त करणार आहे. यानंतर अधिका-यांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधूमेह, मुखरोख व दंत तपासणी, ईसीजी केली जाईल. याशिवाय हसत खेळत तणावमुक्ती वर मार्गदर्शन आदी भरगच्च कार्यक्रम या दोन दिवशी सभेत राजपत्रित अधिका-यांसाठी पार पडणार आहेत.