विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 22, 2016 06:09 IST2016-12-22T06:09:27+5:302016-12-22T06:09:27+5:30
घरातील किरकोळ वादामुळे विवाहितेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला

विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न
कल्याण : घरातील किरकोळ वादामुळे विवाहितेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
अर्चना पाटील (रा. कैलास भुवन, चिकणघर) यांना ५ ते ६ वर्षांपासून सासरची मंडळी घरातील किरकोळ कारणावरू न शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. मंगळवारी सकाळी अर्चना स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना सासरे इंद्रसिंग पाटील यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात भाजलेल्या अर्चनावर ठाणे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात त्यांना पती राजू आणि सासू केसराबाई यांनी मदत केली. (प्रतिनिधी)