उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आरोपीला चप्पल मध्ये अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न

By सदानंद नाईक | Updated: January 14, 2025 01:01 IST2025-01-14T01:00:10+5:302025-01-14T01:01:46+5:30

आरोपी पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला, गुन्हा दाखल

Attempt to deliver drugs in slippers to the accused in the premises of the Ulhasnagar court, | उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आरोपीला चप्पल मध्ये अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न

उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आरोपीला चप्पल मध्ये अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न

सदानंद नाईक

उल्हासनगर : न्यायालयाच्या आवारात कारागृहातून तारखेसाठी आणलेल्या आरोपीला एका अज्ञात व्यक्तीकडून चप्पलेमध्ये लपवून अंमली पदार्थ (गांजा) देण्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपीने पहिल्या मजल्यावरून सिमेंटच्या जाळीतून उडी मारून प्रसार झाला असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर न्यायाल्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी हर्षल सकट याला सोमवारी आणण्यात आले होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने आरोपी सकट याला चप्पलचा बॉक्स दिला. पोलिसांनं संशय आल्याने, बॉक्स तपासल्यावर त्यात दोन स्लीपर चप्पल होत्या. पोलिसांनी चप्पलची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २५० ग्राम अंमली (गांजा) पदार्थ मिळून आला. पोलिसांनी चप्पलचा बॉक्स देणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने न्यायालयाच्या पहिल्या मजल्याच्या सिमेंट जाळीतून उडी मारून पळ काढला. आरोपी हर्षद सकट हा एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे.

 सोमवारी उल्हासनगर न्यायालयात तारीख असल्याने न्यायालयात आणले होते. सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी निघताना चप्पल मध्ये गांजा देण्याचा प्रकार घडला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अज्ञात व्यक्ती आरोपी हर्षदला अमली पदार्थ देण्यासाठी आला होता, की हर्षदच्या माध्यमातून कारागृहात इतर कोणाला हे अमली पदार्थ पुरवलं जात होत. याचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Attempt to deliver drugs in slippers to the accused in the premises of the Ulhasnagar court,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.