तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:22+5:302021-05-18T04:42:22+5:30

डोंबिवली : पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न ...

Attempt to kill a young man | तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

डोंबिवली : पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता आयरेगाव, समतानगर झोपडपट्टीत घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी रोहित धोत्रे, विकास नवले आणि ओमकार या तिघांना अटक केली आहे.

माझ्या बहिणीला शिव्या का देतो अशी विचारणा करून रोहित धोत्रे आणि अन्य दोघा आरोपींनी राहुलचा भाऊ राजू याला बेदम मारहाण केली होती. ही घटना गुरूवारी रात्री १२.३० वाजता घडली होती. याप्रकरणी राजूची बहीण दीपा सोनार हिने रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता तिघांनी राजू आणि दीपाचा भाऊ राहुलवर प्राणघातक हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केडीएमसीच्या कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे तिघा आरोपींनी टिकटॉकवर व्हिडीओ करून थेट पोलिसांना आव्हान दिले होते. हा व्हिडीओ पोलिसांच्या ही हाती लागला होता. अखेर रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी आणि पोलीस अधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या पथकाने दहशत माजविणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या.

------------------------------------------------------

Web Title: Attempt to kill a young man