शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदारावर गाडी नेण्याचा प्रयत्न: ठाण्यात वकीलाच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:39 IST

लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत, अशी अरेरावीची भाषा करीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्या आदित्य फड (१८) या वकील पुत्राला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे.

ठळक मुद्देमाजी जिल्हा सरकारी वकीलाच्या मुलाचे प्रतापनौपाडा पोलिसांनी केली अटकगाडीच्या क्रमांकाच्या आधारे लागला शोध

ठाणे: सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणा-या आदित्य एकनाथ फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे. ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांचा तो मुलगा आहे.मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याच्या दिशेने आदित्य ९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास सिग्नल तोडून त्याच्या काळी फिल्म असलेल्या कारने येत होता. नाशिक मुंबई वाहिनीवरील सिग्नल तोडल्यानंतर त्याची कार हरिनिवासकडे येणा-या सिग्नलकडे थांबली.

त्यावेळी त्याच्याकडे नौपाडा वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी चालक अनुज्ञप्तीची (लायसन्स) मागणी केली. त्याने अरेरावीची भाषा करीत लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत नसल्याचेही त्याने सुनावले. त्यानंतर त्याने कार रेस करुन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कॉन्स्टेबल हारुगले आणि थोरवे यांनी तिथे धाव घेतली. त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा करुनही त्याने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल भामरे यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नितिन कंपनीकडे पलायन केले. त्यावेळी खैरमोडे यांच्या डाव्या हाताच्या एका बोटालाही मार लागला. गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी धर्मवीरनगर सेवा रस्त्यावरुन आदित्यला अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मात्र त्याने नरमाईने घेत पोलिसांच्या अंगावर गाडी घालून चूक केल्याचे मान्य केले.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस