पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न - जगदीश खैरालिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST2021-04-26T04:37:13+5:302021-04-26T04:37:13+5:30
ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. ...

पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न - जगदीश खैरालिया
ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. भांडवलशाही प्रबळ होत चालली आहे. पण याने निराश न होता शेतकरी आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन अशा सर्व अन्याय्य गोष्टींविरुद्ध लढले पाहिजे. सरकारवर वचक ठेवण्यासाठी अभ्यास, मनन, लेखन करून सत्याग्रही, लोकशाही समाजवादाचा विचार पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात जगदीश खैरालिया यांनी केले.
या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर, प्रवीण खैरालिया यांनी आंबेडकरांचे विचार आपल्या शब्दात मांडले. एकलव्य कार्यकर्ते आतेश शिंदे आणि ओंकार जंगम यांनी समतेचे गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अजय भोसले यांनी सांभाळली. फेसबुकवर लाईव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.
-------
फोटो मेलवर