रायगडच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:27 AM2018-04-26T01:27:03+5:302018-04-26T01:27:03+5:30

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांना सिनेस्टाईल अटक

An attempt to boil the ransom from the Shiv Sena office bearer of Raigad | रायगडच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

रायगडच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

ठाणे : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाºयाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने सिनेस्टाईल बेड्या ठोकल्या. नुकतेच लग्न झालेल्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी या आरोपींनी दिली होती.
ठाण्यातील सेनेच्या एका बड्या पदाधिकाºयाच्या मुलीचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. तुमच्या मुलीशी माझे प्रेम होते. तिचे लग्न झाल्याने मी निराश झालोय. तिच्यावर माझे पाच लाख रुपये खर्च झाले. ते परत न दिल्यास मुलीसोबतचे खासगी फोटो आणि चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी त्यात दिली होती. या पदाधिकाºयाने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आपली मुलगी निष्कलंक असल्याचे समजले. मात्र, त्यानंतरही मेसेजेस सुरू असल्याने, पदाधिकाºयाने ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आरोपीला पैसे देण्याची तयारी दर्शविली. ठरल्याप्रमाणे, २१ एप्रिल रोजी रात्री तक्रारदार अडीच लाखांची बॅग घेऊन पालीकडे रवाना झाले. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये मेसेजेसमधून संवाद सुरू होता. पैसे पाठवण्यासाठी आरोपीने पालीजवळील आमडोशी फाट्याजवळच्या फलकाचे छायाचित्र पाठवत तेथे बॅग ठेवण्याचे सांगितले. शनिवारी ७.३०च्या सुमारास तेथे बॅग ठेवून तक्रारदार रवाना झाले. खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी आधीच दबा धरून बसलेले होते. ८च्या सुमारास दोघे त्या फलकाजवळ काही वेळ घुटमळले. एकाने बॅग उचलताच, दबा धरलेल्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

झटपट श्रीमंतीचा मार्ग
सुशांत तेलंगे आणि शुभम गोळे अशी त्यांची नावे आहेत. सुशांत रोहा तालुक्याचा, तर शुभम नागोठण्याचा आहे. दोघांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी खंडणी उकळण्याचा कट त्यांनी दोन महिन्यांपूर्वी रचला होता.

Web Title: An attempt to boil the ransom from the Shiv Sena office bearer of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा