शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: July 1, 2024 20:50 IST

आरोपी अटकेत : गस्तीवरील पोलिसांनी लागलीच केले जेरबंद

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सागर नाना देशमुख (४०) या मसाला विक्रेत्यावर त्याच दुकानात पूर्वी काम करणाऱ्या हरिश्चंद्र गायकवाड (३०) या कर्मचाऱ्याने पूर्ववैमनस्यातून कोयत्याने खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आरडाओरडा ऐकून ठाणेनगर पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. नवीन कलमानुसार ठाणेनगर पोलिस ठाण्यात हा पहिलाच गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बदलापूर येथे राहणारे सागर नाना देशमुख (४०) हे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील के. जी. वणगे या मसाला दुकानात नोकरी करतात. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ते ठाणे स्टेशनवर उतरून नेहमीप्रमाणे राघोबा शंकर रोडने कामावर जात होते. त्याचवेळी हरिश्चंद्र या त्यांच्या कामावरील पूर्वीच्या सहकाऱ्याने भर रस्त्यात गाठून त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोर पुन्हा देशमुख यांच्यावर वार करण्यास पुढे सरसावला. मात्र देशमुख यांच्यासोबत असलेले सूचित शिंदे यांनी हल्लेखोरास पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी गस्तीसाठी जाणारे ठाणेनगर पोलिस ठाण्याच्या बीट क्रमांक एकचे पाेेलिस हवालदार अविनाश वाघचौरे यांनी आरडाओरडा ऐकल्याने त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी या हल्लेखोरास तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. हल्लेखाेराचा देशमुख यांच्याशी कामावरून जुना वाद होता. याच रागातून त्याने हा हल्ला केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.नवीन कलमाखाली पहिला गंभीर गुन्हा दाखल-

या हल्ल्यात देशमुख यांच्यावर कोयत्याने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. ठाणेनगर पोलिस ठाण्यात नवीन भारतीय न्यायसंहिता कलम ११८ (२), ३५१ (२) २०२३ नुसार (जुने कलम भारतीय दंड विधान - ३२६, ५०६ गंभीर दुखापत करणे) सह कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल केला. ठाणे परिमंडळ एकमध्ये नवीन कलमाखाली हा पहिलाच गंभीर गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याच पाेलिस ठाण्यात नवीन कायद्यातील कलम ३०३ (२) पूर्वीचा कलम ३७९ हा चाेरीचा पहिलाच गुन्हा इंद्रकुमार जैन यांनी दाखल केला. जैन यांचा साेमवारी बाजारपेठेतून ५० हजारांचा माेबाइल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चाेरीस गेला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी