भाजपा शहर उपाध्यक्षावर हल्ला

By Admin | Updated: April 17, 2017 04:40 IST2017-04-17T04:40:14+5:302017-04-17T04:40:14+5:30

जमिनीच्या वादातून भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांचा भाऊ

Attack on BJP Vice President BJP | भाजपा शहर उपाध्यक्षावर हल्ला

भाजपा शहर उपाध्यक्षावर हल्ला

कल्याण : जमिनीच्या वादातून भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांचा भाऊ, बहीण आणि अन्य मंडळीही जखमी झाली. याप्रकरणी भोईर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भोईर यांनी ज्यांच्यावर आरोप केला आहे, त्यांनीही भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कॅटरिंगचा व्यवसाय करणारे भोईर हे उंबर्डे गावात राहतात. ते भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष असून दोन वर्षांपासून ते या पदावर आहेत. त्यांचा नातेवाइकांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा भाऊ भरत भोईर, बहीण सुनीता भंडारी, अन्य एक भाऊ बंडू भोईर हे जखमी झाले.
हल्ला करणारे रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू अशी हत्यारे होती. जगदीश भोईर, संदेश भोईर, रामदास भोईर, बळीराम भोईर, स्वप्नील भोईर, योगेश भोईर यांनी हल्ला केल्याचा आरोप शत्रुघ्न यांनी केला आहे. १५ ते २० जणांनी घरात घुसून हा हल्ला केला. हल्लेखोरांनी शत्रुघ्न यांची आई जनाबाई, लहान मुलगी सचिता व प्रतीक यांनाही सोडले नाही.
हल्ल्यात जखमी झालेले शत्रुघ्न, भरत आणि सुनीता यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Attack on BJP Vice President BJP