बनावट नोटाप्रकरणी २ अटकेत

By Admin | Updated: May 13, 2016 02:03 IST2016-05-13T02:03:28+5:302016-05-13T02:03:28+5:30

वाडा तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजारात बनावट नोटा वटविणा-या दोघांना गेल्या शुक्र वारी पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणी त्यांनी आणखी दोन आरोपींना गजाआड केले आहे.

Attachment to the fake note 2 | बनावट नोटाप्रकरणी २ अटकेत

बनावट नोटाप्रकरणी २ अटकेत

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस येथील आठवडा बाजारात बनावट नोटा वटविणा-या दोघांना गेल्या शुक्र वारी पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणी त्यांनी आणखी दोन आरोपींना गजाआड केले आहे. तर दोघा संशयितांना ताब्यातही घेतले आहे.
कुडूस येथे शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. या आठवडा बाजारात गदीॅ असते. या गर्दीचा फायदा घेऊन बनावट नोटा देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या. त्यानंतर नोटा बनावट असल्याचे व्यापाऱ्यांच्या फार उशीराने लक्षात आल्यानंतर काहींनी कुडूस दूरक्षेत्रात तक्रार केली असता पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटा वटविणारे अनिकुल शेख व रेजाऊल हुसेन या दोघांना अटक केले होते.
या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी प्रदीप नर (पश्चिम बंगाल) व किरण हिलम (रा. झिडके, ता. भिवंडी) या दोघांची नावे सांगितली असून त्यांनाही अटक केली आहे.
या दोघांनी चिंचघर ता. वाडा येथील दोन संशियतांची नावे सांगितली असून त्यानांही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आत्ता पर्यंत आरोपींची संख्या चार झाली आहे. अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Attachment to the fake note 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.