आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार
By Admin | Updated: March 25, 2017 01:20 IST2017-03-25T01:20:12+5:302017-03-25T01:20:12+5:30
एका आठ वर्षांच्या मूकबधिर मुलास दोन रुपयांचे आमिष दाखवून एका तरुणाने अत्याचार केला. संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप देत भार्इंदर पोलिसांच्या स्वाधीन केले.

आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार
मीरा रोड : एका आठ वर्षांच्या मूकबधिर मुलास दोन रुपयांचे आमिष दाखवून एका तरुणाने अत्याचार केला. संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप देत भार्इंदर पोलिसांच्या स्वाधीन केले.
भार्इंदर पश्चिमेच्या एका झोपडपट्टीत राहणारा हा मूकबधिर मुलगा भरोस चौधरी (२०) याच्याकडे अधूनमधून टीव्ही पाहण्यासाठी जात असे. भरोस हा अविवाहित असून एका कंपनीत कामाला आहे. बुधवारी सायंकाळी त्याने मुलास खाऊसाठी दोन रुपये देतो, असे आमिष दाखवून घरी नेले. घरातच भरोसने त्याच्यावर अत्याचार केला. मुलाने घरी आल्यावर आईला घडलेला प्रकार सांगितला. या मुलाने भरोसच्या घराकडे बोट दाखवले. हे कळताच
संतप्त झालेल्या नागरिकांनी भरोसला चांगलाच चोप देत भार्इंदर पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलाला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून भरोसला अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नवनाथ लहांगे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोषीवर करड कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)