चिमुरडीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST2021-05-13T04:40:59+5:302021-05-13T04:40:59+5:30

------------------------------------------------------ कोरोनाने १९ मृत्यू कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर नव्या ५२८ रुग्णांची भर ...

Atrocities on Chimurdi | चिमुरडीवर अत्याचार

चिमुरडीवर अत्याचार

------------------------------------------------------

कोरोनाने १९ मृत्यू

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर नव्या ५२८ रुग्णांची भर पडली. २४ तासांत ७२७ रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला. सद्यस्थितीला पाच हजार ७११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार ७७७ रुग्ण आढळले असून एक हजार ६०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एक लाख २० हजार ४६३ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

-------------------------------------------------

बाबाजी पोखरकर यांचे निधन

कल्याण : भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ (बाबाजी) अनसू पोखरकर यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ होते. महिनाभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कल्याणच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करीत होते. कल्याण पश्चिमेतील श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष होते.

---------------------------------------------------

Web Title: Atrocities on Chimurdi