शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:58 IST

एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली

ठाणे : एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.मुंब्रा-कौसा भागातील साउथ इंडियन बँक आणि इंडियन बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करून ४९ ग्राहकांच्या खात्यातून १९ लाख ७५ हजार रुपये काढल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर तपास केला. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून तपास सुरू केला. आरोपी निश्चित करण्यासाठी जवळपास ५ लाख ६१ हजार मोबाइल नंबर्सचे विश्लेषणही पोलिसांनी केले. या दरम्यान चार मोबाइल नंबरवर पोलिसांना संशय आला. हे चारही नंबर काही वेळासाठी सुरू व्हायचे आणि ते केवळ एकमेकांच्या संपर्कात असायचे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तीन पुरुष आणि एक महिला आरोपीस मुंब्रा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली.एटीएममध्ये कार्ड स्वाइप केले जाते, त्या ठिकाणी आरोपी स्कीमर लावायचे. त्यामुळे ग्राहकाने कार्ड स्वाइप केले की, त्याचा तांत्रिक तपशील स्कीमरमध्ये रेकॉर्ड व्हायचा. याशिवाय, एटीएम मशीनमध्ये ग्राहक पिन नंबर टाकताना टिपला जाईल, अशा ठिकाणी वरील भागात चिनी बनावटीचा लहान कॅमेरा आरोपी लावायचे. काही तासांनी कॅमेरा आणि स्कीमर आरोपी घेऊन जायचे. स्कीमरमधील तांत्रिक तपशील बनावट एटीएममध्ये अपलोड केल्यानंतर कॅमेºयातील फुटेज तपासून ग्राहकाचा पिन नंबर मिळवला की, आरोपी ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे. कॅमेरा आणि स्कीमर लावण्यासाठी सुरक्षारक्षक नसलेले एटीएम आरोपी हेरायचे.आरोपींमध्ये मुंब्रा येथील हैदरअली शेरअली सारंग (वय २०), मुंबईतील डोंगरी चाळीतील सोहेल उमर शेख (वय ४४), याच भागातील मोहम्मद जैद फरीद रंगवाला (वय २९) आणि डोंगरी येथील तबस्सुम अबु बखर मेस्त्री ऊर्फ जान्हवी ऊर्फ ज्योत्स्ना (वय ३१) यांचा समावेश आहे. मोहम्मद जैद हा सॅण्डहर्स्ट स्टेशनजवळील व्होडाफोन गॅलरीमध्ये कामाला असून त्याने इतर ग्राहकांच्या ओळखपत्रांच्या आधारे मिळवलेले सीमकार्ड्स आरोपींना दिले होते. आरोपी एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावत असताना बाहेर लक्ष ठेवण्याचे काम तबस्सूम करायची. एका आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा यापूर्वी हैदराबादमध्येही केला होता, अशी माहिती पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डेय यांनी यावेळी दिली.

टॅग्स :atmएटीएमThiefचोरthaneठाणेArrestअटकjailतुरुंग