शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

अटलजींना आगळीवेगळी काव्यांजली; दिनेश गुप्ता लिहिणार १२ तास कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:15 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी कवी, प्राध्यापक दिनेश गुप्ता हे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहेत.

- जान्हवी मोर्ये कल्याण : मुत्सद्दी नेते, उत्कृष्ट संसदपटू, अजातशत्रू तसेच संवेदनशील कवी भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी कवी, प्राध्यापक दिनेश गुप्ता हे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहेत. गुप्ता सलग १२ तास कवितालेखन करणार आहेत. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.सार्वजनिक वाचनालयातर्फे वाजपेयी यांना ही काव्यमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आजपर्यंत सलग १२ तास कविता लिहिण्याचा विक्रम कुणीही केलेला नाही. त्यामुळे हा प्रयत्न करताना जास्तीतजास्त कविता आणि आकारानेही मोठ्या कविता लिहिणार असल्याचे गुप्ता म्हणाले.गुप्ता हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते नेरळच्या दिलकापकर इंजिनीअरिंग महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसरपदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही त्यांच्यापुस्तकाचे कौतुक केले आहे. काही वर्षांपासून ते हिंदी, मराठी, इंग्रजीमध्ये लेख आणि कविता लिहीत आहेत. त्याचबरोबर त्यांची भाषणेही प्रेरणादायी असतात. आफ्रिकेतील इथिओपिया येथून ‘लाइफ कॉच’ची पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी १५ देशांत जाऊन ३२ हजारांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केले आहे. २१०० व्याख्याने दिली आहेत. ते अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणी सदस्यपदांवर कार्यरत आहेत. त्यातून त्यांनी ४६ जोडप्यांना विवाहबद्ध केले आहे.शिक्षण, पर्यावरण आणि आध्यात्मिक क्षेत्रात ते निरंतर सेवा करत आहेत. सहा हजारांहून अधिक पुस्तकांचे वाचन त्यांनी केले आहे. याशिवाय, त्यांना लोकांशी परिचय वाढवणे, पेंटिंग बनवणे, गाणी म्हणे, नवीन भाषा शिकणे, फोटोग्राफी आदी छंद त्यांनी जोपासले आहेत.आगामी पुस्तके‘दैनिक जीवन में भगवद्गीता’, ‘पैसे की समझ’, ‘सफलता के शिखर पर भाग-२’, ‘कसौधन बिरादरी - इतिहास और भविष्य’ ही प्रा. गुप्ता यांची पुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यू