मुंब्रा येथे गॅलरीचा स्लॅब कोसळला, शंभर वर्षीय आजीबाईंची सुखरूप सुटका
By कुमार बडदे | Updated: April 6, 2023 18:38 IST2023-04-06T18:38:44+5:302023-04-06T18:38:55+5:30
मुंब्रा येथे २० ते २५ वर्षापूर्वीच्या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला.

मुंब्रा येथे गॅलरीचा स्लॅब कोसळला, शंभर वर्षीय आजीबाईंची सुखरूप सुटका
मुंब्रा: येथील आंबेडकर नगर जवळील पडलेकर वाडी परीसरात असलेल्या राणा निवास या तळ अधिक एक मजली लोडबेरिंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घरामध्ये अडकलेल्या शंभर वर्षीय लक्ष्मी मंचेकर या आजीबाईंचा सुखरूप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सदरची इमारत २० ते २५ वर्षापूर्वीची आहे. या इमारती मध्ये ऐकून आठ कुटुंबे रहातात गँलरी पडलेला आणि त्याच्या खालील तमजल्यावरील रुम खाली करण्यात आला असून, इमारतीच्या उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या बाजूने धोकापट्टी लावण्यात आली आहे, अशी माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.