लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Published: April 5, 2024 04:35 PM2024-04-05T16:35:59+5:302024-04-05T16:38:26+5:30

Jitendra Awhad : "कोसा भागात ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता."

At least the authorities should have learned after the Lucky Kapound disaster says Jitendra Awhad | लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड

लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड

ठाणे :  मुंब्रा, कौसा भागात ११ वर्षापूर्वी लकी कंपाऊंड इमारत दुर्घटना घडली होती. या घटनेत तब्बल ७४ जणांचा जीव गेला होता. परंतु या घटनेला आज इतके वर्ष उलटल्यानंतर त्यातून काही तरी शिकायला हवे होते. परंतु पालिकेचे अधिकारी काही शिकायलाच तयार नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  

या भागात आजही  अवघ्या चार - चार दिवसात स्लॅब भरले जात असून ही किमया स्थानिक बिर्ल्डर करुन दाखवत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आपण आता आणखी एका नवीन लकी कंपाऊंड दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत या बांधकामांवरुन संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ही टीका केली आहे.

कोसा भागात ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला. अनेकजण तुरूंगात गेले. या घटनेनंतर जवळपास ८ वर्षे मुंब्रा, कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभे राहिले नव्हते. आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवे होते. पण, अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या चार - चार दिवसात स्लॅब भरणे हे एल अँड टी ला शक्य नाही. ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत,  असेच हे सर्व पाहून वाटते. आज ना उद्या मरणारच आहेत तर हे इमारतीच्या ढिगाºयाखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगर पालिकेच्या अधिकाºयांची झाली आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
आयुक्त नवीन आहेत, त्यांना काही समजण्याच्या आत कामे पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत. परंतु ठाणे महापालिकेचे आताचे

आयुक्त सौरभ राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसेच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच, खालच्या अधिकाºयांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचे नुकसान होईल. वाचवायला कुणीच येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: At least the authorities should have learned after the Lucky Kapound disaster says Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.