कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली आहे. लाड यांच्याकडे सध्या अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. लाड हे सरकारी नोकरीत असताना महा टॅलेंट सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेड या मुलुंड येथील कंपनीत ऑगस्ट 2013 पासून तर डोंबिवलीच्या कस्तूरी निवारा क्रिएसन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2012 पासून संचालक पदावर कार्यरत आहे. सरकारी नोकरीत कार्यरत असताना खाजगी कंपनीत संचालक पदावर कार्यरत असल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. महापालिकेने लाड यांची विभागीय चौकशी लावली होती. या चौकशीअंती त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शन मागविले होते. सरकारकडून मार्गदर्शन प्राप्त झाले. महापालिका आयुक्तांनी लाड यांना सेवेतून निलंबीत करण्याची कारवाई केली आहे. लाड यांच्या खाजगी कंपनीत संचालक पदाचा मुद्दा गत विधीमंडळ अधिवेशनात उपस्थित केला गेला
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड निलंबीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 20:38 IST