भिवंडी पालिकेचे सहायक आयुक्त निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST2021-06-09T04:50:01+5:302021-06-09T04:50:01+5:30

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भिवंडी ...

Assistant Commissioner of Bhiwandi Municipality suspended | भिवंडी पालिकेचे सहायक आयुक्त निलंबित

भिवंडी पालिकेचे सहायक आयुक्त निलंबित

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भिवंडी महापालिकेचे प्रभाग समिती पाचचे तत्कालीन सहायक आयुक्त यांच्यासह प्रभारी शहर विकासप्रमुख या दोघांनाही मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी निलंबित केल्याची माहिती प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. या कारवाईमुळे पालिकेतील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रभाग समिती क्रमांक पाचचे तत्कालीन सहायक आयुक्त सोमनाथ सोष्टे तसेच तत्कालीन प्रभारी शहर विकासप्रमुख या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र वरळीकर यांनी प्रभाग समिती क्रमांक पाचअंतर्गत शिवाजी चौक खाडीपार रोड येथील खासगी व्यावसायिक गाळ्यांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता सरकारी नियमांचे उल्लंघन करून या गाळ्यांवर कारवाई केल्याचे उघड झाले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयुक्तांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशी करण्यासाठी सेवेतून निलंबित केले आहे.

Web Title: Assistant Commissioner of Bhiwandi Municipality suspended