पत्ते खेळताना बोलावल्याने हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:36 IST2019-09-18T00:36:30+5:302019-09-18T00:36:35+5:30
पत्ते खेळताना बोलावल्याच्या रागातून महिलेची हत्या केल्याची घटना उसरघर परिसरात रविवारी घडली.

पत्ते खेळताना बोलावल्याने हत्या
डोंबिवली : पत्ते खेळताना बोलावल्याच्या रागातून महिलेची हत्या केल्याची घटना उसरघर परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी हत्या करणारा बालाराम रामा दिवे (३५) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
उसरघर गाव येथील चिंतामण पाटील यांच्या शेतीवर मजूर म्हणून काम करणारा बालाराम आणि यमुना (३०) हे दोघे वीटभट्टीजवळील खोलीत दीड महिन्यांपासून राहत होते. दारूचे व्यसन असलेला बालाराम नशेत यमुनाला मारहाण करत असे. रविवारी रात्री बालाराम मित्रांसह पत्ते खेळत बसला होता. यावेळी, यमुना त्याला बोलवायला गेली. यामुळे संतापलेल्या बालारामने स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या यमुनाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.