शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना सक्तीची सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 14:31 IST

या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे, याकडे डुंबरे यांनी जिल्हाधिकााऱ्यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधत खासगी डाँक्टरांना सेवा देणे सक्तीचे करण्यासाठी मागणी लावून धरली आहे.

ठाणे :  जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या विशेष कोविड रुग्णालयांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, तेथे शहरातील खासगी डॉक्टर व नर्सला सक्तीची सेवा करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचे सातत्याने रुग्ण आढळत असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांनी कोविडसाठी विशेष रुग्णालये उभारली आहेत. मात्र, त्यासाठी डॉक्टर, नर्ससह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. ठाणे महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड रुग्णालयासाठी दहा वेळा वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. त्याचबरोबर मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. मात्र, डॉक्टर उपलब्ध  होत नसल्याची समस्या गंभीररुप धारण करीत असल्याचे वास्तव डुंबरे यांनी उघड केले आहे. 

या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे, याकडे डुंबरे यांनी जिल्हाधिकााऱ्यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधत खासगी डाँक्टरांना सेवा देणे सक्तीचे करण्यासाठी मागणी लावून धरली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात एमडी, एमबीबीएस आणि बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची संख्या मोठी आहे. या डॉक्टरांना महिन्यातील १५ दिवस काम करण्याची सक्ती केल्यास डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील. त्याच पद्धतीने नर्सनाही सरकारी रुग्णालयात हजर राहण्याच्या सक्तीचा आदेश द्यावा, अशी मागणी  डुंबरे यांनी केली आहे.पुण्याच्या धर्तीवर अंमलबजावणी करावी  पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश काढून खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करण्याची सक्ती केली आहे. अन्यथा, साथरोग कायदा १८९७ व अन्य कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यातून ५५ वर्षे, आजार असलेल्या डॉक्टरांना वगळण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपा