शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एल्फिन्स्टनच्या घटनेवरचा उद्वेग आपल्या संगीतात का नाही?, आशुतोष जावडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:58 IST

आपल्या संगीतात विद्रोही संगीताची परंपराच नाही. नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेवर आपल्या संगीतात तो उद्वेग का होत नाही, असा सवाल लेखक आशुतोष जावडेकर यांनी केला.

ठाणे : आपल्या संगीतात विद्रोही संगीताची परंपराच नाही. नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेवर आपल्या संगीतात तो उद्वेग का होत नाही, असा सवाल लेखक आशुतोष जावडेकर यांनी केला.मॅजेस्टीक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफले, ते जावडेकर यांनी. सावरकर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या सांगीतिक गप्पा रंगल्या. पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आताच्या संगीताकडे पाहिले तर गीतकार चांगले आहेत; पण गडकरींच्या गाण्यातील ‘तुटणारा पदर’ आढळत नाही. आपला संगीत प्रवास उलगडताना ते म्हणाले, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे. जो सुरांचा लोभी आहे. शब्द-स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. तो अनेक गायकांना नाही. ऐकणे हा पहिला रियाज असतो. मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल, तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो, तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशननिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शून्यातून निर्माण होत नाही. गाणे ही ऐकण्याबरोबर बघण्याचीदेखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेलेदेखील असते. दृश्यकला आणि श्रवणकला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इंडिपेंडंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझिक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणाºया चांगल्या गोष्टी या परभाषिकांपर्यंत पोहोचाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे, तर गाणेही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते, हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगीतिक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचीतला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. काही गाणी भयंकर असतात; पण आपण हा विचार करावा, जी गाणी कर्णकटू वाटतात, ती ऐकण्याची मर्यादा आपली कुठे संपतेय का? ज्यांना पाश्चात्त्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल, त्यांनी कंट्री संगीतापासून सुरुवात करावी. पाश्चात्त्य संगीत हे वाईट नसतंच. चांगले गाणे हे जगण्याच्या इतके जवळ येते की, त्याचे नुसते विश्लेषण करून चालत नाही. शब्दांची समीक्षा करताना शब्द वापरतात, मग सुरांची समीक्षा ही सुरांनीच व्हायला हवी. अर्थात, ते सर्वांना जमेलच असे नाही. म्हणून, सुरांची समीक्षा शब्दांनी केली जाते. संगीताच्या लोकशाहीकरणामध्ये समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. गाणे आवडले की, आपण ते लगेच शेअर करतो. स्वतंत्र गायक, लेखक, कवी यांना त्याचा खूप फायदा झाला आहे. आपल्या आयुष्यात गाणे हे खंबीरपणे उभे असते. ते एक मित्रासारखे असते. त्या मित्राची आपल्याला जाणीव असली, तरी ती पुसट होते; पण मित्र मात्र ताकदीचा असतो. गाण्यातील अंतरीची खूण पटते. तुम्ही गायक असा किंवा नसा, गात मात्र जा, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे