शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

केंद्राच्या महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:59 IST

गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.

मीरा रोड - गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. पक्षाच्या नावाने निमंत्रण पत्रिका देतानाच प्राधिकरणाच्या शासकीय पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करण्यात आली आहे.ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूरसह स्थानिक आमदार प्रताप सरनाईक आदी शिवसेना, बविआ, राष्ट्रवादीसह भाजपाच्या आमदारांना देखील खालची जागा दाखवत एकमेव भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना मात्र मंत्री, खासदारांच्या वरच्या रांगेत स्थान दिले आहे. वसई-विरारच्या महापौरांसोबत अनेक आमदारांना देखील डावलले आहे. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक ठिकाणी अंडरपास, एका ठिकाणी पादचारी पूल, घोडबंदर खिंडीचे रुंदीकरण तसेच वरसावे येथे खाडीवर नवीन पूल बांधण्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. सदर सर्व कामं ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केली जाणार आहेत.त्या अनुषंगाने भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील प्राधिकरणानेच ठेवला असून, तो मीरा रोडच्या एस. के. स्टोन श्रीकांत जिचकर चौक येथे उद्या गुरुवारी ११ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तशी निमंत्रण पत्रिका प्राधिकरणाने काढली आहे. परंतु मीरा-भार्इंदर भाजपाने मात्र नेहमीप्रमाणेच पक्षाच्या निमंत्रण पत्रिकाच सोशल मीडियावर टाकल्या असून, सदर कार्यक्रम जणू प्राधिकरणाचा नसून भाजपाचा आहे, असेच चित्र उभे केले आहे. त्यातच एमएमआरडीच्या निधीतून होणारा जेसलपार्क - घोडबंदर मार्गाचा पहिला टप्पा, सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा असा काँक्रिट रस्ता , भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक सुशोभीकरण आदी कामांचे सुद्धा भूमिपूजन नमूद करण्यात आले आहे.शासकीय कार्यक्रम पक्षाच्या नावे खपवतानाच दुसरीकडे प्राधिकरणाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करण्यात आली आहे. प्राधिकरणाने तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत चक्क मंत्री आणि खासदारांच्या ओळीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांना स्थान देण्यात आलं आहे. तर त्या खालच्या रांगांमध्ये मात्र चक्क ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक या सोबतच आमदार क्षितिज ठाकूर, निरंजन डावखरे, संजय केळकर, आशिष शेलार, रवींद्र फाटक, पास्कल धनारे, डॉ. भारती लव्हेकर, बाळाराम पाटील, सुभाष भोईर, अमित घोडा, विलास तरे, शांताराम मोरे आदी आमदारांना स्थान दिले आहे.एकमेव आ. नरेंद्र मेहता यांनाच मंत्री, खासदारांमध्ये स्थान दिले आहे. वरसावे नवीन पुलाची हद्द ही वसई-विरार महापालिकेत देखील आहे. परंतु तेथील महापौर रुपेश जाधव यांना डावलले आहे. दहिसर - बोरिवलीचे आमदार मनीषा चौधरी व प्रकाश सुर्वे यांना सुद्धा स्थान दिलेले नाही.वास्तविक प्राधिकरणाच्या वतीने महामार्गावर ज्या कामांचे भूमिपूजन होणार आहे तो सर्व भाग हा शिवसेना खासदार राजन विचारे व सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातला आहे. तर भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा हा मतदारसंघच येत नाही. पण तरी देखील आ. मेहतांना वरची रांग तर ठाकूर, सरनाईक आदी सर्व आमदारांना खालच्या रांग पत्रिकेत दिल्याने आ. मेहतांच्या वजनाची चर्चा चांगलीच रंगली आहे. आ. मेहतांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. शिवाजी पवार ( राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ) - गुजरात कार्यालयातून निमंत्रण पत्रिका आली असून, याबद्दल आपण अधिक काही बोलू शकत नाही.प्रताप सरनाईक ( आमदार ) - पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व मी सातत्याने वरसावे नवीन पुलासह विविधकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्व कामं आमच्या मतदारसंघात आहेत. राजशिष्टाचाराचे मुद्दाम उल्लंघन केले गेले असून, या विरोधात हक्कभंगचा प्रस्ताव आणणार आहे.अविनाश गुरव ( बविआ जिल्हाध्यक्ष ) - लोकनेते हितेंद्र ठाकूर हे ज्येष्ठ आमदार असून, आमच्या नेत्यांचा अवमान हा मुद्दाम केलाय. प्राधिकरणाने माफी मागावी. जेव्हा गरज होती तेव्हा आ. मेहता हे आमच्या नेत्यांचे उंबरठे झिजवत होते. आता बहुमताच्या मस्तीत ठाकूर यांनी केलले उपकार व मदत ते विसरले असावेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर