आशिष पाटील ठरला ‘धर्मवीर श्री २०१७’
By Admin | Updated: February 7, 2017 03:49 IST2017-02-07T03:49:11+5:302017-02-07T03:49:11+5:30
तालुक्यातील आसनगाव येथे रंगलेल्या ‘धर्मवीर श्री ’ या शरीरसौष्टव स्पर्धेत आशिष पाटील याने बाजी मारली. पिळदार शरीराच्या कट्स, स्टेप म्युझिकवर शरीरसौष्टवपटंूनी दिलेल्या

आशिष पाटील ठरला ‘धर्मवीर श्री २०१७’
डहाणू : तालुक्यातील आसनगाव येथे रंगलेल्या ‘धर्मवीर श्री ’ या शरीरसौष्टव स्पर्धेत आशिष पाटील याने बाजी मारली. पिळदार शरीराच्या कट्स, स्टेप म्युझिकवर शरीरसौष्टवपटंूनी दिलेल्या पोझेस आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप अनेकांना भारावून गेली. १९ पिळदार बॉडी बिल्डर तरुणांच्या या मांदियाळीत प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर आशिष पाटील ने आपले नाव कोरले.
वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठान तर्फेशरीरसौष्ठव स्पर्धा व सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुरुवातीला तीन गटात घेण्यात आली. त्यात ६० किलोमध्ये सफाळ्याचा शशिकांत गुढे, ६५ किलोमध्ये श्रीअर्श तिवारी तर ७० किलोमध्ये आशिष पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतरच्या फायनल राऊंडमध्ये या तिघांमध्ये झालेल्या मुकाबल्यात आशिषने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्याने यापूर्वी डहाणू श्री, भार्इंदर श्री हे किताब पटकावले असून यापुढे तो गुजरात श्री, व महाराष्ट् श्री या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे त्याने लोकमतला सांगितले. या स्पर्धेला रसिकांनी आणि स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. (वार्ताहर)
प्रतिष्ठान करते विविधांगी कार्य
कृषी प्रतिष्ठान व गुरु कुल शिक्षण संकुल यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक युवतींना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. तसेच कुणीही बेरोजगार राहू नये यासाठी त्याला व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते, यासोबतच विद्यार्थी आणि तरुणांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील, विकास पाटील यांनी सांगितले.