उल्हासनगरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा सेवकांना मारहाण
By सदानंद नाईक | Updated: March 12, 2025 19:19 IST2025-03-12T19:19:10+5:302025-03-12T19:19:35+5:30
आशासेविका संघटनेचा दबाव आल्यावर तक्रार नोंदवून घेतली आहे.

उल्हासनगरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा सेवकांना मारहाण
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, भरतनगर येथे सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशासेविकाना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याबाबतची तक्रार न घेण्याचा प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांनी केला असून आशासेविका संघटनेचा दबाव आल्यावर तक्रार नोंदवून घेतली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ भारतनगर परिसरात दोन आशासेविका मंगळवारी दुपारी कुष्टरोग व शयरोग आजाराचे सर्वेक्षण करीत होत्या. त्यावेळी त्यांनी एका घराचा दरवाजा माहिती घेण्यासाठी वाजवीला. मात्र घरा बाहेर आलेल्या एका इसमाने महिलांना गलिच्छ शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याचा प्रकार झाला. याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या आशा सेविकांना तब्बल ५ तास बसून ठेवण्यात आल्याचा आरोप आशासेविका यांनी केला. अखेर आशासेविका युनियनचे पदाधिकारी भगवान दवणे, डॉ राजाराम रासकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना फोन करून झालेला प्रकार सांगून तक्रार घेण्याची मागणी केली. त्यानंतर उशिराने तक्रार नोंदवून घेतली. फोन केला, तेंव्हा कुठे पीडित आशा ताई यांची तक्रार नोंदवून घेतली.
या प्रकाराबाबत आशासेविकानी नाराजी व्यक्त केली. महापालिका आरोग्य विभागाने याबाबत दखल घ्यावी, असी भावना आशासेविकांनी बोलून दाखविली. शहरभर असे काम करीत असताना अशा विविध प्रकाराला आशासेविकांना तोंड द्यावे लागते. पोलिसांनी याबाबत सहकार्यांची भुमिका घेतल्यास या प्रकाराला आळा बसेल. असेही आशासेविकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गलिच्छ शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.