आईनं आजीकडे तक्रार केली म्हणून मुलानं १६ व्या मजल्यावरून उडी मारली
By धीरज परब | Updated: November 21, 2023 19:48 IST2023-11-21T19:48:30+5:302023-11-21T19:48:36+5:30
इतक्या उंची वरून तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तो कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात ११ वीत शिकत होता.

आईनं आजीकडे तक्रार केली म्हणून मुलानं १६ व्या मजल्यावरून उडी मारली
मीरारोड - आईने सासूला अर्थात स्वतःच्या १७ वर्षीय मुलाच्या आजीकडे तो अभ्यास करत नाही, सारखा बाहेर फिरतो अशी तक्रार केली. या रागातून एका मुलाने १६ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.
मीरारोडच्या जे पी नॉर्थ गार्डन मध्ये १६ व्या मजल्यावर मोहम्मद शादाब चौधरी हे पत्नी, १७ वर्षांचा मुलगा अयान व त्याच्यापेक्षा लहान असलेल्या दोन मुलींसह राहतात. अयान हा अभ्यास करत नाही, बाहेर फिरत असतो म्हणून त्याची आई त्याला समजावत असे. सोमवारी दुपारी आईने स्वतःच्या सासूला अर्थात अयानच्या आजीला कॉल केला होता. अयान हा अभ्यास करत नाही, नाहक बाहेर फिरत असतो असे त्याच्या आजीला सांगितले. आपल्याबद्दल आजी कडे तक्रार केल्याचा राग आल्याने अयान ह्याने रागाच्या भरात हॉल मधील ग्रील नसलेल्या उघड्या बाल्कनी मधून खाली उडी मारली. इतक्या उंची वरून तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तो कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात ११ वीत शिकत होता. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काशीमीरा पोलिसांनी सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे . तर उंच इमारतीतील सदनिकांच्या बाल्कनी व खिडक्यांना सुरक्षा जाळी लावणे धोकादायक ठरल्याचा मुद्दा ह्या घटनेने चर्चेत आला आहे .