शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची क्लिप व्हायरल होताच पालिका अधिकाऱ्याला मारहाण

By जितेंद्र कालेकर | Updated: February 15, 2023 20:57 IST

सहायक आयुक्त महेश आहेर यांचे कथित संभाषण: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शार्पशूटरला सुपारी दिल्याचे संभाषण असलेली ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथित आॅडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या आवारात आहेर यांना काही आव्हाड समर्थकांनी मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना पोलिस संरक्षणामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नौपाडा पोलिसांकडून सुरू होती.

आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण व्हायरल झाले. या संभाषणात आहेर यांनी आव्हाड यांचा उल्लेख ‘साप’असा केला असून, त्यांना ठेचण्याची भाषा केली आहे. या क्लिपमध्ये आहेर यांचे पोलिस संरक्षण काढले तेव्हा त्याच रात्री पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी सहपोलिस आयुक्तांना फोन करून आहेर यांच्या जिवाला आव्हाड यांच्यापासून धोका असल्याचे सांगितल्याचे खुद्द आहेर यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर यांना सांगून आव्हाड यांचे कुटुंब व त्यांना संपविण्याकरिता मोठी रक्कम मोजल्याचा उल्लेख केलेला आहे. ठाकूर व आहेर यांच्या व्यावहारिक संबंधांचीही या कथित क्लिपमध्ये चर्चा असल्याचे समजते.

अशा धमक्यांना घाबरत नाही :आव्हाडअशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलिस तक्रारही करणार नाही. कारण, पोलिस काही करणार नाहीत, हे माहीत आहे, अशी प्रतिक्रीया  जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी आहेर यांना ठाणे महापालिकेच्या आवारात गाठले. तिथेच त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिस संरक्षणात उपचारांसाठी नौपाडा पोलिसांनी दाखल केले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी