मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वात जास्त भाजपाच्या ८७ पैकी तब्बल ४६ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. शिंदेसेनेच्या १३, उद्धवसेनेच्या ७, मनसेच्या ५, काँग्रेसच्या ४, राष्ट्रवादी अजित पवारच्या ४ तर शरद पवार पक्षाच्या ३ उमेदवार वर देखील गुन्हे दाखल आहेत. बलात्कार, हत्येचा प्रयत्न, फसवणूक, विश्वासघात, सरकारी कामात अडथळा, मारहाण पासून राजकीय आंदोलनाचे देखील गुन्ह्यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक पक्ष आणि नेते चांगल्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना तिकिटे देणार असे दावे करत असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र गुन्हे दाखल असणे हे देखील आता उमेदवारी देण्याचा निकष बनला असल्याचे दिसत आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात भाजपाने सर्वात जास्त ४६ गुन्हेगारी दावे असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
उमेदवारांची महापालिका संकेतस्थळावर अपलोड शपथपत्राच्या माहिती नुसार भाजपाच्या प्रभाग २० मधील उमेदवार दिनेश जैन यांच्यावर तब्बल १० केस आहेत. त्यात ४२०, विश्वासघात सारखे गुन्हे आहेत. प्रभाग २१ मधील मनोज दुबे यांच्यावर ९ केस असून दिनेश जैन सारखीच गंभीर कलमे आहेत. प्रभाग १ मधील अशोक तिवारी यांच्यावर ८ केस असून भ्रष्टाचार प्रतिबंधक, ४२० आदी कलमे आहेत.
६ केस असलेल्यां मध्ये भाजपाचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील, अनिल विराणी, दीप्ती भट, अनिता पाटील यांचा समावेश आहे. गेहलोत वर फसवणुकीचे २ तर ध्रुवकिशोर व विराणी यांच्यावर फसवणूक, विश्वासघातचे गुन्हे आहेत. ५ गुन्हे दाखल असलेल्यात प्रशांत दळवी, माजी महापौर डिम्पल मेहता, आनंद मांजरेकर, गणेश शेट्टी, नयना म्हात्रे, विशाल पाटील यांचा समावेश आहे. दळवी यांच्यावर बलात्काराचा १ व फसवणुकीचे २; मांजरेकर यांच्यावर फसवणूक, विश्वासघातचे २ तर डिम्पल मेहता, नयना म्हात्रे व गणेश शेट्टी यांच्यावर फसवणुकीचा प्रत्येकी १ केसचा समावेश आहे. ऑर्केस्ट्रा बार चालक शेट्टी यांच्यावर पिटाचा पण गुन्हा आहे.
गुन्हे - केसचा चौकार मारण्यात भाजपच्या वर्षा भानुशाली, सीमा शाह, हेतल परमार, मोहन म्हात्रे, रुपाली शिंदे, सुरेखा सोनार, महेश म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. वर्षा भानुशाली यांना लाच प्रकरणात ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाखांचा दंडची शिक्षा झाली आहे. शिवाय वर्षा सह सीमा शाह, हेतल परमार, मोहन म्हात्रे, सुरेखा सोनार व रुपाली शिंदे यांच्यावर ४२० सह विश्वासघात आदी केस आहेत.
३ गुन्हे - केस असलेले उमेदवार म्हणून भाजपाच्या वंदना भावसार, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, मीरादेवी यादव, संजय थेराडे, सुनीता जैन, दीपिका अरोरा, पंकज उर्फ दरोगा पांडेय, भगवती शर्मा यांच्या नोंदी आहेत. बहुतांश जणांवर फसवणूक, विश्वासघातची केस आहे. पांडेय यांच्यावर फसवणुकीचे २ गुन्हे आहेत.
२ गुन्हे - केस असलेल्या मध्ये भाजपच्या ऍड. तरुण शर्मा, मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंह, ऍड. रवी व्यास, नीला सोन्स, राकेश शाह, वंदना मंगेश पाटील, स्नेहा पांडे, तुषार पारधी यांची नावे समोर आली आहेत. ह्यातील नीला यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी तर ऍड. व्यास, शाह, सिंह, पाटील यांच्यावर फसवणूक आदी कलमे नोंद आहेत.
१ केस असलेल्या भाजपा उमेदवारात संजय थरथरे, जयेश भोईर, ऍड. मयुरी म्हात्रे, प्रेमनाथ पाटील, नवीन सिंग, सुरेश खंडेलवाल, प्रेमनाथ पाटील, कुसुम गुप्ता, श्रद्धा कांबळी, ऍड. मयुरी म्हात्रे यांची नावे आहेत. भोईर व खंडेलवाल यांच्यावर ४२०, विश्वासघात सारखी कलमे आहेत. नवीन सिंग हे बलात्कार आदी कलमांचे आरोपी होते.
या शिवाय भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार असलेल्या अनिल भोसले यांच्यावर ३ गुन्हे असून त्यात बलात्कारचा समावेश आहे. गणेश भोईर यांच्यावर ४ केस असून त्यात फसवणुकीचा समावेश आहे. प्रभात पाटील वर २ तर मीना कांगणे वर १ दावा आहे. तसेच रिटा शाह यांच्यावर 2 गुन्हे आहेत.शिंदेसेनेच्या ८१ पैकी १३ उमेदवारांवर गुन्हे - दावे दाखल आहेत. शंकर झा, संदीप पाटील व मुस्तफा वणारा यांच्यावर प्रत्येकी ५ केस असून फसवणुकीचे झा वर २, वणारा वर ३ तर पाटील यांच्यावर १ गुन्हे आहेत.
४ गुन्हे - दावे असलेले शिंदेसेनेचे प्रवीण पाटील वर ४२०, महेश शिंदे वर जुगार तर परशुराम म्हात्रेंवर मारहाण आदी गुन्हे आहेत. अश्विन कसोदरिया यांच्यावर ३ गुन्हे असून त्यात फसवणुकीचे २ आहेत. तारा घरत व पवन घरत यांच्यावर प्रत्येकी २ गुन्हे असले तरी तारा यांचे राजकीय गुन्हे संपुष्टात आले आहेत. पवन पाटील, प्रतिभा तांगडे व शर्मिला बगाजी यांच्यावर प्रत्येकी १ केस नोंद आहे.
काँग्रेसच्या ३१ पैकी ४ उमेदवारांवर गुन्हे आहेत. त्यात प्रमोद सामंत वर पर्यावरण संरक्षण सह ५ दवे, अजय सिंह वर हत्या, बलात्कार, फसवणुकीचे असे एकूण ४ गुन्हे आहेत. ऍड. अजितकुमार गुप्ता यांच्यावर कौटुंबिक ३ केस तर जय ठाकूर वर १ केस आहे.
उद्धवसेनेच्या ५६ पैकी ७ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यात स्नेहल सावंत यांच्यावर फसवणूक सह एकूण ६ केस, सॅबी फर्नांडिस वर २ केस, दीपेश गावंड वर २ तर मानसी म्हात्रे, मनीषा भोपळे, आयुष चव्हाण व राजू विश्वकर्मा यांच्यावर प्रत्येकी १ केस आहे. विश्वकर्मा वर पालिका शहर अभियंता दीपक खांबित यांच्या हत्येचा प्रयत्न आदी नुसार गुन्हा आहे.
मनसेच्या ११ पैकी ५ उमेदवारांवर केस आहे. त्यात हेमंत सावंत यांच्यावर ३ आंदोलन आदींचे तर रेश्मा तपासे, अनिल रानावडे, दृष्टी घाग व अभिनंदन चव्हाण यांच्यावर प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अमजद शेख यांच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. तर ५ गुन्हे दाखल असलेल्या शबनम शेख यांच्यावर हत्येचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे आहेत. मोझेस चिनाप्पा यांच्यावर ३५३ कलम सह एकूण ३ केस आहेत. तर परवीन मोमीन यांच्यवावर फसवणुकी सह एकूण २ गुन्हे आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार) चे गुलाम नबी फारुकी यांच्यावर २ गुन्हे त्यात ३५३ कलम आदींचा १ तर अल्फीया फारुकी यांच्यावर ३५३ कलम चा १ व ऍड . विक्रम तारे पाटील यांच्यावर १ केस आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे पंकज इंगोले यांच्यावर १ गुन्हा आहे.
Web Summary : In Mira Bhayandar, BJP leads with 46 candidates facing criminal charges. Other parties also have candidates with pending cases, including serious offenses like fraud and attempted murder, raising concerns about candidate selection criteria.
Web Summary : मीरा भायंदर में भाजपा 46 आपराधिक आरोप वाले उम्मीदवारों के साथ आगे है। अन्य दलों के उम्मीदवारों पर भी धोखाधड़ी और हत्या के प्रयास जैसे गंभीर मामले लंबित हैं, जिससे उम्मीदवार चयन मानदंडों पर चिंता बढ़ रही है।