शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीबद्दल अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली ठाणे पोलिसांची दखल

By जितेंद्र कालेकर | Updated: April 20, 2020 01:42 IST

ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात वास्तव्याला असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या १२ तरुण तरुणींना ठाणे पोलिसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. अरुणाचलच्या सीएमओ कार्यालयाच्या ट्वीटर हँडरद्वारे त्यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

ठळक मुद्दे ट्वीटद्वारे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी मानले जाहीर आभार ठाण्याच्या ब्रम्हांड येथील १२ तरुण तरुणींना पुरविल्या आवश्यक वस्तूमहाराष्ट्र सीएमओ कार्यालयालाही दिली माहिती

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अरुणाचल प्रदेश येथील काही विद्यार्थी आणि विद्यार्थीनी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले असून त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती ठाणेपोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या पथकाने त्यांना शनिवारी ही मदत पुरवली. पोलिसांच्या याच कामगिरीची दखल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी घेतली असून ट्वीटरद्वारे जाहीर कौतुकही केल्याची माहिती त्यांनी सीएमओ महाराष्ट्र आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयालाही कळविली आहे.अरुणाचल प्रदेशमधील रहिवाशांच्या चेहऱ्यावर चीनच्या नागरिकांचे साधर्म्य आहे. कोरोनाची लागण होण्यासही चीनपासूनच सुरुवात झाली. चीनी समजून कोणी हल्ला तर करणार नाही ना? शिवाय, ठाणे शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या ब्रम्हांड भागात शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने अडकलेल्या अरुणाचल प्रदेशच्या सहा तरुण आणि सहा तरुणींपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. ही माहिती त्यांनी थेट अरुणचल प्रदेश सरकारला कळविली. याची दखल अरुणाचलच्या सीएमओ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे एकेकाळी वैयक्तिक सचिव (पीएस) असलेले अरुणाचलचे विद्यमान सह सचिव प्रशांत लोखंडे यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे शासनाच्या मार्फतीने या १२ जणांना काही मदत करता येईल का? अशी विचारणा केली. तेंव्हा पाटील यांनी या सर्वांचे पत्ते घेऊन वैयक्तिक पदरमोड करीत त्यांना अत्यावश्यक सामान १८ एप्रिल रोजी घरपोच दिले. ठाणे पोलिसांनी कोरोनासारख्या अडचणीच्या काळात केलेल्या तत्पर मदतीबद्दल हे सर्व विद्यार्थी भारावून गेले. ही माहिती मिळताच अरुणाचल प्रदेशच्या सीएमओ कार्यालयाचे लोखंडे यांनीही पाटील आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस