शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड
By सदानंद नाईक | Updated: February 21, 2023 18:14 IST2023-02-21T18:13:35+5:302023-02-21T18:14:25+5:30
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली.

शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड
उल्हासनगर : शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली. अशान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून सुरवातीला शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करण्याचे काम अरुण अशान यांनी करून त्यांनी शिवसेना शिंदे गटात अनेकांना प्रवेश देऊन पक्ष मजबूत केला. सुरवातीला उपशहरप्रमुख पदी असलेले अरुण अशान यांची थेट उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी निवड केली. तर शिवसेनेचे गेली १५ वर्ष शहरप्रमुख पदी राहिलेले राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एकाच गुन्ह्यात खंडणी, अपहरण, फसवणूक आदी १९ गुन्हे दाखल झाल्यावर, दुसऱ्याच दिवशी त्यांनी समर्थकासह मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. तर गेल्या महिन्यात समर्थकासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. चौधरी यांनी उल्हासनगरसह म्हराळगाव, कांबागाव याचे महानगरप्रमुख पदी निवड करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. चौधरी यांना शहरात मोठा जनाधार असल्याने, त्याचा शिवसेनेला फायदा होणार आहे.