कृत्रिम तलावात २११२७ श्री मूर्तींसह १३६९ गौरींचे विसर्जन

By Admin | Updated: September 23, 2015 04:06 IST2015-09-23T04:06:23+5:302015-09-23T04:06:23+5:30

पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले.

In the artificial lake, 21127 immersion of 136 Gauri with Shri Murthas | कृत्रिम तलावात २११२७ श्री मूर्तींसह १३६९ गौरींचे विसर्जन

कृत्रिम तलावात २११२७ श्री मूर्तींसह १३६९ गौरींचे विसर्जन

ठाणे : पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले. तर महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४०३ गणेश मूर्तींचे व २ गौरीचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि १० व्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे.
या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर पारिसक रेती बंदर आणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.
पाचव्या दिवशी मासुंदा तलावामध्ये २ हजार ५३० श्री गणेशमूर्ती व ७२ गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार ७८१ गणेश मूर्ती व ९३ गौरीचे, उपवन आणि नाळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार १४५ मूर्तींचे व २११ गौरी, आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावात ७०८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच पारिसक येथे बांधलेल्या विसर्जन महाघाटावर १ हजार ५०८ गणेश मूर्ती व ९० गौरीचे, तर कोलशेत घाटासह इतर सात विसर्जन घाटांवर एकूण ३६४० गणेश मूर्तींसह ४७४ गौरीचे विसर्जन करण्यात आले. कळवा प्रभाग समितीअंतर्गत विविध विसर्जन घाटावर १ हजार ९८७ गणेश मूर्तींचे व १३४ गौरीचे विसर्जन केले.
दरम्यान महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रि येला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये अनिरु ध्द अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंटचे जवळपास ५०० स्वयंसेवक, १५० महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: In the artificial lake, 21127 immersion of 136 Gauri with Shri Murthas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.