आर्टसच्या ‘कट आॅफ’मध्ये झाली घसरण!
By Admin | Updated: July 15, 2016 01:26 IST2016-07-15T01:26:55+5:302016-07-15T01:26:55+5:30
मंगळवारी सायंकाळी अकरावीची तिसरी कट आॅफ लिस्ट जाहीर झाली. ठाणे आणि परिसरांतील महाविद्यालयांच्या कट आॅफवर नजर टाकली असता विज्ञान शाखेसाठी दुसऱ्या

आर्टसच्या ‘कट आॅफ’मध्ये झाली घसरण!
ठाणे : मंगळवारी सायंकाळी अकरावीची तिसरी कट आॅफ लिस्ट जाहीर झाली. ठाणे आणि परिसरांतील महाविद्यालयांच्या कट आॅफवर नजर टाकली असता विज्ञान शाखेसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या लिस्टमधील गुणांमध्ये एखाद्या टक्क्याचा फरक झाला आहे. दुसरीकडे आर्ट्स शाखेच्या कट आॅफमध्ये मात्र घसरण आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लिस्टच्या कट आॅफमध्ये फारसा फरक नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष तिसऱ्या लिस्टकडे लागले होते. तिसऱ्या लिस्टमध्येही विज्ञान शाखेचा कट आॅफ ९० टक्क्यांच्या जवळपासच असल्याने या शाखेसाठी इच्छुकांची धास्ती मात्र काहीशी कायम आहे. बांदोडकर महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कट आॅफ ९२, तर बिर्ला महाविद्यालयाचा ९०.६० आणि सीएचएम महाविद्यालयाचा ९० टक्के इतका आहे. तुलनेने आर्ट्स कट आॅफ बराच कमी असून आर्ट्ससाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सोपा झाला आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा कला आणि वाणिज्य शाखांचा कट आॅफ अनुक्रमे ६२ आणि ८५.८० टक्के आहे. बिर्ला महाविद्यालयाचा कला शाखेचा कट आॅफ घसरून थेट ४०.४० टक्क्यांवर आला आहे. तर, वाणिज्यचा ८१.६० टक्के आहे.
अद्यापही कुठेच प्रवेशाची संधी उपलब्ध न झालेल्यांसाठी चौथी यादी सोमवारी १८ जुलैला जाहीर होईल.