लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लग्नाचे अमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया शोयेब खान (२५, रा. हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला २२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट, गौतमनगर येथील ही पिडित तरुणीशी शोयेब याने लग्नाचे आश्वासन देत जवळीक वाढविली. याचाच फायदा घेत त्याच्या गौतमनगर येथील राहत्या घरी तसेच कशेळी, भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार आॅक्टोबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०२० या काळात सुरु होता. वारंवार होणाºया या अत्याचाराला कंटाळून तिने अखेर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने आरोपी खान याला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.
लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:36 IST
लग्नाचे अमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया शोयेब खान (२५, रा. हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई