लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विटाव्यातील अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधून आग लावणाऱ्या दोघांपैकी विक्रम उमाळे (२७, रा.विटावा, कळवा, ठाणे) यालाा कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कळव्यातील विटावा सूर्यनगर गेट क्रमांक एक येथील रहिवासी भगत याने त्याची स्कॉर्पिओ ऋषी पार्क अपार्टमेंटजवळ उभी केली होती. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटांतील दोघांनी त्याच्या स्कॉर्पिओला आग लावून मोठे नुकसान केले. भगत याच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाले पोलीस ठाण्यात जबरी चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या स्कॉर्पिओला आग लावणारे दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांनी विक्रम याला अटक केली. त्याने मोटारीला का पेटविले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 22:49 IST
विटाव्यातील अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधून आग लावणाऱ्या दोघांपैकी विक्रम उमाळे (२७, रा.विटावा, कळवा, ठाणे) यालाा कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली.
विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे कळवा पोलिसांची कामगिरी दुसऱ्या आरोपींचा शोध सुरू