शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

कोकण परिक्षेत्रात सर्वाधिक लाचखोर ठाण्यातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० ...

ठळक मुद्दे वर्षभरात ४४ सापळयांमध्ये ६६ सरकारी नोकर गजाआडसर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत ४४ सापळे लावण्यात आले. यात ६६ लाचखोरांना अटक झाली. यामध्ये सहा विभागातील सर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. तरीही अगदी क्षुल्लक कामांसाठीही सामान्य व्यक्तींची अडवणूक होते. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा विभागांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. २०१९ मध्ये कोकण परिक्षेत्रात १०९ गुन्हे दाखल झाले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी ही घट झाल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृतीसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा २०२० मध्ये ठाणे परिक्षेत्रात एकूण ४३ सापळे लावण्यात आले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये वर्षभरात ६६ लाचखोर सापळयात अडकले. यामध्ये २५ लाचखोरांना ठाण्यातून अटक झाली. त्यापाठोपाठ पालघर विभागात सहा, नवी मुंबई आणि रायगड विभागात प्रत्येकी चार, रत्नागिरीत तीन आणि सिंधुदुर्ग मध्ये एका गुन्हयाची नोंद झाली. यंदाही लाचखोरीत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग अव्वल क्र मांकावर होते. त्यापाठोपाठ पोलीस कर्मचारी लाचेच्या सापळयात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ठाणे विभागाकडून १०९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये १०२ सापळे लाचेचे तर पाच अपसंपदा आणि दोन भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा समावेश होता. यंदा मात्र, लॉकडाऊनमुळे यात घट आली असली तरी नागरिकांनीही भीती न बाळगता तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

‘‘ लाचखोरी ही समाजाला कॅन्सरसारखी पोखरत आहे. ज्याची अडवणूक होते, त्या नागरिकांनीही तक्रारीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे. अनेकदा चिरिमिरीसाठी कामांची अडवणूक होते. पण, नागरिकांनीही तक्रार केली नाही तर एसीबीलाही कारवाई करणे अवघड होते. संबंधित विभागप्रमुखांनीही अशा लाचखोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासकीय कारभार पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. ’’डॉ. महेश पाटील, अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र.

* २०२० मध्ये विभागनिहाय कारवाईठाणे - २५पालघर - ६नवी मुंबई - ४रायगड - ५रत्नागिरी -३सिंधुदुर्ग - १एकूण - ४४एकूण अटक - ६६

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग