शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:07 IST

मुंबईच्या पवईतील एकाच कंपनीत कामाला असलेल्या सह कर्मचाºयाने माजी कर्मचारी तरुणीला तिचाच खासगी फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याची तक्रार दाखल होताच भरत अय्यर याला अखेर नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडयातील घटनातांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला रत्नागिरीतून अटक व्हॉटसअ‍ॅपवर फोटो पाठवून दिला मानसिक त्रास

ठाणे : नौपाड्यातील एका चोवीसवर्षीय तरुणीला तिचा खासगी फोटो पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या भरत अय्यर (२६, रा. सहारगाव, अंधेरी, मुंबई) याला शुक्रवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पवईतील एका खासगी कंपनीमध्ये ही तरुणी नोकरीला होती. तिथेच भरतही तिच्यासोबत नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी तिने ही नोकरी सोडली. कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या तिच्या लॅपटॉपवर वैद्यकीय कारणासाठी तिने तिचे काही फोटो काढले होते. तिने नोकरी सोडल्यानंतर तो लॅपटॉप भरतला मिळाल्यानंतर त्याने तिचे हे फोटो स्वत:च्या मोबाइलमध्ये घेतले. नंतर, एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्याने तिचे ते ‘खासगी’ फोटो तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. हे फोटो पाठवताना तिचा ‘शुभचिंतक’ असल्याचा त्याने त्यावर उल्लेख केला. नंतर, ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. १५ ते २४ मे २०१९ यादरम्यान हा प्रकार घडला. आपलेच फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या या तरुणीने २४ मे रोजी दुपारी विनयभंगाची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक मोहिनी कपिले, महेश कवळे, हवालदार सुनील अहिरे, संजय चव्हाण आणि पोलीस नाईक दिनेश महाले यांच्या पथकाने अंधेरीच्या सहारगाव भागातून २४ मे रोजी रात्री भरतला अटक केली. त्याचा मोबाइलही जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग