कंत्राटदाराला केली अटक
By Admin | Updated: April 26, 2017 23:58 IST2017-04-26T23:58:29+5:302017-04-26T23:58:29+5:30
गटाराचे बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून झालेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणी नवघर पोलिसांनी

कंत्राटदाराला केली अटक
मीरा रोड : गटाराचे बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून झालेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणी नवघर पोलिसांनी अखेर पालिका अधिकाऱ्यासह ठेकेदार सिव्हील इन्फ्राच्या विशाल दशरथ काणेरकर आणि राहुल मुकेश व्यास यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विशालला अटक केली आहे.
जेसल पार्क, रेल्वे समांतर मार्गावर महापालिकेने गटारासाठी १५ ते २० फूट खोदकाम करत बांधकाम सुरू केले. मात्र, लगतच्या एंजल इमारतीची कुंपण भिंत यामुळे पडण्याचा धोका विचारात न घेतल्याने काम सुरू असताना सोमवारी रात्री भिंत कोसळली. त्याखाली सापडून मुन्ना (४०) हा मजूर मरण पावला, तर दोघे जखमी झाले. (प्रतिनिधी)