रोकड लंपास करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:32 IST2020-09-21T00:32:30+5:302020-09-21T00:32:43+5:30

नौपाडा पोलिसांची कामगिरी : ३६ हजारांच्या रोकडसह रिक्षाही केली जप्त

Arrested for cash laundering | रोकड लंपास करणाऱ्यास अटक

रोकड लंपास करणाऱ्यास अटक


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नव्यानेच सुरू केलेल्या दुकानासाठी सुट्या पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलिव्हरी करणाऱ्यांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फय्याज उस्मान मेमन (२९, रिक्षाचालक, रा. जोगेश्वरी) यास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त केली असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते.
लोकमान्यनगर येथील रहिवासी प्रदीप गुणाजी गराटे (५४) हे त्यांच्या साक्षीदारासह ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या नौपाड्यातील भास्कर कॉलनी येथील किराणा दुकानात त्यांच्या एजन्सीच्या मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना नौपाडा परिसरात आपण नव्याने दुकान सुरू केल्याची बतावणी केली. या दुकानातही त्यांना विविध मालाचा भरणा करायचा असल्याचे सांगून त्यांचा विश्वासही संपादन केला.
त्याच परिसरातील ‘श्री मांगल्य’ या इमारतीमध्ये वास्तव्याला असल्याचाही बहाणा करून व्यवसायासाठी सुट्या पैशांची निकड असल्याचे भासविले. त्यांच्याकडे मालाच्या डिलिव्हरी करताना जमा झालेली ३६ हजारांची रोकड त्यांच्याकडून घेतली. त्याबदल्यात बंदे पैसे त्याच्या वडिलांकडून घेण्यासाठी प्रदीप आणि त्याच्या साथीदाराला ‘श्री मांगल्य’ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाठवून ते दोघेही तिथून पसार झाले होते.
त्यानंतर, प्रदीप यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेºयामधील चित्रणाची पाहणी केली. तेव्हा फसवणूक करणाºयाचा आणखी एक साथीदार रिक्षा घेऊन आल्याचे आढळले. त्याच रिक्षातून दोघेही पळून गेल्याचे उघड झाले. या सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे तसेच परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजमार्फत रिक्षाचा क्रमांक मिळवूनफय्याज मेमन या रिक्षाचालकाला १४ सप्टेंबर रोजी रात्री मोरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने या लुटीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली असून त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Arrested for cash laundering